अकोल्यात बोंडअळीवर होणार मंथन! राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:20 AM2018-02-25T01:20:03+5:302018-02-25T01:20:03+5:30
अकोला : बीटी कपाशीवर बोंडअळीचा वाढता प्रभाव बघता, या विषयावर अकोल्यात मंथन होणार आहे. १0 मार्च रोजी डॉ. पंदेकृविच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर करतील. या चर्चासत्राला कापूस उत्पादक विभागातील सर्व कृषी अधिकार्यांची उपस्थिती राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, विदर्भातील शेकडो शेतकर्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. या अस्मानी, सुलतानी संकटांचा सामना करताना, शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या प्रचंड खचला आहे.
राज्यात यावर्षी ४१ लाख हेक्टर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, विदर्भात १६ लाख ४५ हजार ६00 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
मराठवाडा १६ लाख ९२ हजार ४१६, खान्देश ७ लाख ८८ हजार १५, तर पश्चिम महाराष्ट्रात २३ हजार ११८ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. यावर्षी राज्यात १0 टक्के कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कपाशीचे पीकही जोरदार आले होते. पण अळ्य़ांनी आक्रमण केल्याने हे पीक हातचे गेले. विदर्भात मान्सूनपूर्व कपाशी पेरणी केली जाते. या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पात्या आणि फुले गळती होऊन कपाशीचे प्रचंड नुकसान झाले.
या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने या अळीचा सखोल अभ्यास करू न शेतकर्यांना त्यांची इंत्थभूत माहिती मिळावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत या विषयावर अकोल्यात राज्यस्तरीय मंथन होणार आहे.
या चर्चासत्राला कापूस उत्पादक जिल्हय़ातील सर्व कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकार्यांची उपस्थिती राहील.