विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 06:30 PM2019-02-08T18:30:06+5:302019-02-08T18:30:39+5:30
अकोला : महावितरण ,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, ...
अकोला : महावितरण,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अश्या अतांत्रिक अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न/समस्या सोडविण्याकरीता झटणाºया म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथे ९ व १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) योगेश गडकरी, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) महापारेषण सुगत गमरे, प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर दिलीप घुगल, मुख्य महाव्यवस्थापक संदेश हाके, मुख्य महाव्यवस्थापक स्वाती व्यवहारे आणि कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातील तिन्ही कंपन्यांचे सुमारे ४०० वीज अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे आयोजन आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे.
म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटणीस दिलीप शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी नागपूर परिमंडळाचे अध्यक्ष प्रवीण काटोले, सचिव राजेश कुंभरे तसेच शरद दाहेदार, सविता झरारीया, तृप्ती मुधोळकर, प्रमोद खुळे,नंदकिशोर पांडे,वैभव थोरात, निलेश जुमळे, राधेश्याम उईके, नागपूर परिमंडळातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत, अशी माहिती अधिकारी संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी विकास आढे यांनी दिली.