अकाेला पाेलिसांच्या नाे मास्क, नाे सर्व्हीसची राज्यस्तरावर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:57+5:302021-03-19T04:17:57+5:30
अकाेला : काेराेनाचे संकट गडद हाेत असल्याने मार्च २०२० मध्ये कडक लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता. मात्र, त्यानंतरही रुग्णसंख्या वाढत ...
अकाेला : काेराेनाचे संकट गडद हाेत असल्याने मार्च २०२० मध्ये कडक लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता. मात्र, त्यानंतरही रुग्णसंख्या वाढत असल्याचे वास्तव हाेते. मात्र, यावर उपाय म्हणून मास्क आणि साेशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे असल्याने अकाेला पाेलिसांनी नाे मास्क, नाे सर्व्हीस हा उपक्रम हाती घेतला. त्यामुळे कमी कालावधीत काेराेनासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांचे प्रमाणही बरेच कमी झाले. त्यामुळे अकाेला पाेलिसांच्या या उपक्रमाची दखल थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेत हा उपक्रम राज्यभर राबविला.
काेराेनाचा शिरकाव जिल्ह्यात झाल्यानंतरही जनता भाजी बाजार तसेच शहराच्या बाजारपेठेत माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याचे समाेर आले. साेशल डिस्टन्सिंग तसेच कुणीही मास्क लावत नसल्याचे यावेळी पाेलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाेलिसांनी दंडात्मक कारवायांचा सपाटा लावला. मात्र, तरीही बहुतांश नागरिक जुमानत नसल्याने तसेच पाेलिसांशी वाद हाेत असल्याने भाजी बाजार, किराणा, पेट्राेल यासह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रतिष्ठानांच्या संचालकांची बैठक घेऊन पाेलिसांनी नाे मास्क नाे, सर्व्हीस उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने काेराेनावर काही प्रमाणात मात करण्यास मदत झाली. अकाेला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची दखल थेट राज्य शासनाने घेऊन हा उपक्रम राज्यभरात राबविण्यास प्रारंभ केला हाेता.
पाेलीस निवासस्थान
अकाेला पाेलीस दलातील पाेलीस कर्मचाऱ्यांसाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना, पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून ३७८ अद्ययावत पाेलीस निवासस्थानांचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.
पाेलीस अधीक्षक कार्यालय
खदान पाेलीस ठाण्याच्या जागेत पाेलीस अधीक्षक कार्यालयाच्या भव्यदिव्य इमारतीचे बांधकाम सुरू झालेले आहे. जवळपास ५० टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना अकाेल्याचे पाेलीस अधीक्षक असतानाच त्यांनी या इमारतीसाठी प्रस्ताव सादर केला हाेता. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कार्यकाळात या इमारतीचा श्रीगणेशा झाला.
शुध्द पेयजल याेजना
पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी अत्यंत कमी किमतीमध्ये पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या संकल्पनेतून शुध्द पेयजल याेजना सुरू करण्यात आली आहे.
पेट्राेलपंप व गॅस एजन्सी
पाेलीस कल्याण निधीला हातभार लागावा म्हणून अकाेला पाेलीस प्रशासनाकडून पेट्राेलपंप सुरू करण्यात येणार आहे. या पेट्रोलपंपाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तर पाेलिसांसाठी लवकरच गॅस एजन्सीही कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
भव्यदिव्य राणी महल पाेलीस लाॅन
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्या संकल्पनेतून बनविण्यात आलेले राणी महल पाेलीस लाॅन हे अकाेला पाेलिसांची शान आहे. विदर्भातच नव्हे, तर राज्यातील सर्वात माेठ्या आणि प्रशस्त लाॅन्समध्ये राणी महल पाेलीस लाॅन्सचे नाव आहे. या पाेलीस लाॅन्समुळे पाेलीस कल्याण निधीत चांगली भर पडत आहे.