राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात झोडली ओली पार्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:21 AM2020-05-23T10:21:51+5:302020-05-23T10:22:29+5:30

रात्रभर मद्यपानासह यथेच्छ ओली पार्टी या अधिकाºयांनी झोडल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे.

State Transport Department officials enjoy party in office | राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात झोडली ओली पार्टी!

राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात झोडली ओली पार्टी!

Next

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि राज्यात भयावह परिस्थिती असताना राज्य परिवहन विभागाच्या मुंबई, नागपूर व अमरावती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ मे रोजी अकोल्यातील परिवहन विभागाच्या विश्रामगृहात ओली पार्टी झोडल्याची गंभीर बाब शिवसेना नेते व राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे माजी संचालक विजय मालोकार यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. उच्चपदस्थ अधिकाºयांनी साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा, भादंवि कलम १८८ चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मालोकार यांनी केली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असताना, एसटी महामंडळातील अधिकारी उप-महाव्यवस्थापक सनियंत्रण समिती क्र. ३ शिवाजी जगताप मुंबई, अमरावतीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, नागपूरचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे हे शासकीय वाहनांनी अकोल्यात आले. उप-महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे अकोल्याच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांची चौकशी आहे. या सर्व अधिकाºयांनी सर्व नियम डावलून शासनाच्या, एसटी महामंडळाच्या परिपत्रकांचा भंग करीत, संचारबंदी काळात विभागीय वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाºयांसोबत १२ मे रोजी परिवहन महामंडळाच्या विश्रामगृहावर ओली पार्टी आयोजित केली. याठिकाणी हे अधिकारी मुक्कामी होते. रात्रभर मद्यपानासह यथेच्छ ओली पार्टी या अधिकाºयांनी झोडल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. या अधिकाºयांनी साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा, भादंवि कलम १८८ चे उल्लंघन केल्यामुळे त्यांची चौकशी करून या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना नेते विजय मालोकार यांनी केली आहे.

Web Title: State Transport Department officials enjoy party in office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.