घरकुल लाभार्थींचे बीडीओंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:18 AM2021-05-22T04:18:24+5:302021-05-22T04:18:24+5:30
--------------------- नियमांचे उल्लंघन; ७१ नवे पॉझिटिव्ह बार्शीटाकळी : काेराेनाविषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून नियमांचे उल्लंघन हाेत आहे. तालुक्यात ...
---------------------
नियमांचे उल्लंघन; ७१ नवे पॉझिटिव्ह
बार्शीटाकळी : काेराेनाविषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून नियमांचे उल्लंघन हाेत आहे. तालुक्यात शनिवारी प्राप्त अहवालानुसार, ७१ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
-------------------------
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
मूर्तिजापूर : मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे, वाहनधारक कमालीचे त्रस्त बनले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
0-----------
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
हिवरखेड : गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही अकोट तालुक्यात अनेक भागात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---------------------------
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त!
तेल्हारा : गत तीन ते चार दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वारांच्या अंगावर कुत्री धावून जात असल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
--------------------------
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वाहनचालक त्रस्त!
गायगाव : गायगाव ते डाबकी मार्गाची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून, गिट्टी बाजूला सारली जात असल्याने धूळ उडत आहे. या धुळीमुळे वाहनचालक त्रस्त बनले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
---------------------
अनेक लाभार्भी घरकुलापासून वंचित
बाळापूर : घरकुल लाभार्थी यादी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकुल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------------
कवठा येथे रेतीची अवैध वाहतूक
कवठा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत बाळापूर तालुक्यातील कवठा परिसरात लिलाव न झालेल्या घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
---------------------------
माझोड-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था!
वाडेगाव : माझोड-वाडेगाव रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अकोलाकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने या मार्गाने वाहनचालकांची नेहमी वर्दळ असते.
------------------------------------
खाद्यतेलाचे दर आवाक्याबाहेर!
मूर्तिजापूर : कोरोना संकटात अर्थव्यवस्था ढासळत असताना महागाई मात्र वरचढ होत असल्याने सर्वसामान्य त्रस्त बनले आहेत. सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १५० रुपयांपर्यंत पोहोचले असून, महिलांचे बजेट कोलमडले आहे.
--------------------------------
अकोट तालुक्यात ४३ पॉझिटिव्ह
अकोट : जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मृत्यूंची संख्या वाढत आहे. शुक्रवार, दि. २१ मे रोजी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यात तब्बल ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
---------------------------------
व्याळा येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू
व्याळा : कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, गावातील ४८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.