तेल्हारा ते हिवखेड रस्त्यासाठी मनविसेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:19+5:302020-12-04T04:53:19+5:30
तेल्हारा ते हिवरखेड या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू असून, हा रस्ता अजून पूर्ण न झाल्यामुळे रस्त्यावर दररोज किरकोळ ...
तेल्हारा ते हिवरखेड या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू असून, हा रस्ता अजून पूर्ण न झाल्यामुळे रस्त्यावर दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. १ डिसेंबर रोजी एक मुलगा व त्याची आई रस्त्यावरून दुचाकीने जाताना त्यांच्या दुचाकीचा अपघात घडला. यात मुलाच्या आईचा मृत्यू झाला. रस्त्यावरील वाढते अपघात पाहता, रस्ता करण्याची मागणी मनविसेने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनातून केली आहे. पाच दिवसांच्या आत काम जलद गतीने न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन छेडेल, असा इशारासुध्दा देण्यात आला. यावेळी मनसे अकोला जिल्हा अध्यक्ष रवींद्र फाटे व मनविसे विभागीय चिटणीस ॲड. श्रीरंग तट्टे यांच्या मार्गदर्शनात मनविसेचे शशांक कासवे व मनविसे तेल्हारा तालुका अध्यक्ष कुशल देव, विलास लाजुरकर, महेश सिसोदिया, मंगेश लोळे, मंगेश खुमकर, अब्दुल जावेद, अंकित खुमकर, गौरव टोहरे, प्रीतम पारिसकर, शरद कुयटे, अजय ठाकूर, आकाश अरुडकर, गोलू कुयटे, रोहित तायडे, करण तायडे, चंद्रकात मोडोकार, बजरंग कुयटे, अजय शर्मा उपस्थित होते.
फोटो: