पातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:15+5:302021-05-19T04:19:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, देशावर कोरोनाचे संकट आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागतीचे कामे ...
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, देशावर कोरोनाचे संकट आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागतीचे कामे करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामध्ये केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरामध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरामध्ये केलेली वाढ मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष जे.डी. जाधव, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा रा.काँ.चे गटनेते हिदायतखा रुमखा यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले. यावेळी विजय चव्हाण, विजय बोचरे, पुरुषोत्तम ताले, श्रीधर जनार्दन, प्रवीण इंगळे, सागर कढोणे, परशराम बंड आदी उपस्थित होते.