नगर विकास आराखडा रद्द करण्यासाठी नियोजन समितीला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:36+5:302020-12-16T04:34:36+5:30
नवीन विकास आराखडा तयार करीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच स्थळ निश्चित न करता नवीन आराखडा तयार करण्यात ...
नवीन विकास आराखडा तयार करीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच स्थळ निश्चित न करता नवीन आराखडा तयार करण्यात आला. यापूर्वी नगर परिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारची विकासकामे न करता जमिनी तशाच पडून आहेत. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्यांच्या शेतजमिनी जात आहेत त्यामधील अनेक शेतकरी भूमिहीन होत असून, ज्यांच्याकडे केवळ एकच प्लॉट किंवा खुली जागा आहे अशा जमिनी आरक्षित होत असल्याने अनेकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याचे रुंदीकरण एका विशिष्ट भागापासून होत असल्याने ज्या ठिकाणावरून रस्ता सुरू झाला तेथून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत नसल्यामुळे काही विशिष्ट लोकांवरच रस्ता रुंदीकरण याबाबत अन्याय होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून विशिष्ट लोकांना यामधून वगळण्यात आले असल्याने ज्यांच्या शेती आरक्षित होत आहेत, त्यांच्यावरसुद्धा अन्याय होत आहे. त्यामुळे यापूर्वी नगर परिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर विकासात्मक पावले उचलून विकास करावा, नंतरच नवीन आराखड्याला मंजुरी द्यावी, अशा आशयाचे निवेदन नगर विकास आराखड्यावर हरकती घेतलेल्या नागरिकांनी नियोजन समितीचे अध्यक्ष, नगर विकासमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
फोटो: