राज्यातील पहिला एंटरप्य्रुनअरशिप मेगा प्रकल्प अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:23+5:302021-09-04T04:23:23+5:30
ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. विलास भाले, साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी पार्क (एसटीपीय) चे डायरेक्टर जनरल डाॅ. ओंकार राय, परसिस्टंट सिस्टम्स ...
ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. विलास भाले, साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी पार्क (एसटीपीय) चे डायरेक्टर जनरल डाॅ. ओंकार राय, परसिस्टंट सिस्टम्स तथा चीफ मेंटर फसल संस्थापक तथा मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. आनंद देशपांडे, एसटीपीय डायरेक्टर डाॅ. संजयकुमार गुप्ता, एसटीपीय डायरेक्टर सुबोध सचान नवी दिल्ली इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. गुप्ता यांनी प्रस्तावना व रूपरेषा सांगितली. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी संपूर्ण भारतातून १ हजारपेक्षा जास्त सहभाग नोंदणी झाली होती. यशस्वीतेसाठी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डाॅ. सुधीर वडतकर, तसेच विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. आभारप्रदर्शन डाॅ. सुचिता गुप्ता यांनी केले.
प्रकल्पासाठी १० कोटी मंजूर
हा प्रकल्प डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे प्रकल्प राबविण्यासाठी १० कोटी ९५ लाख मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्राॅनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीकडून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पूर्व केंद्रीयमंत्री संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने व विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. भाले यांच्या पाठपुराव्यामुळे मेगा प्रकल्प डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे मंजूर करण्यात आला आहे.
प्रकल्पांतर्गत होणार हे काम
विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. विलास भाले यांनी प्रकल्पामध्ये आधुनिक रिमोट सेंन्सिंग टेक्नाॅलाॅजीज, डिजिटल व्हेजिटेबल फार्मिंग पोषण स्थिती, मातीतील ओलावा, पीएच आणि देखरेखीसाठी स्मार्ट सोल्युशन विकसित करण्यासाठी, शेती यांत्रिकीकरण, आधुनिक हायड्रोपोनिक स्ट्रक्चरमध्ये व्हर्टिकल फार्मिंग, स्मार्ट कृषी अनुप्रयोग इत्यादी विविध विषयांवर काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.