खासगी रुग्णालयांची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:52+5:302021-01-13T04:44:52+5:30
खासगी रुग्णालये - १६० हॉटेल्स - २५ मंगल कार्यालये - ...
खासगी रुग्णालये - १६०
हॉटेल्स - २५
मंगल कार्यालये - २
अधिकारी म्हणतात,
सार्वजनिक आराेग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे. आवश्यकतेनुसार, रुग्णालयाच्या प्रत्येक वाॅर्डात अग्निशमन सिलिंडर लावण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्मचाऱ्यांना फायर मॉक ड्रिलद्वारे प्रशिक्षण दिले जाते.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्र. आरोग्य उपसंचालक, अकोला
२०१६-१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक विभागामार्फत जीएमसीचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच प्रलंबित आहे. सर्वोपचार रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात अग्निशमन सिलिंडर कार्यान्वित असून बहुतांश भागात हे सिलिंडर नव्याने बसविण्यात आले आहेत.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला
जिल्हा स्त्री रुग्णालयातील इलेक्ट्रिक ऑडिट २०१९-२० मध्ये झाले. दोन दिवसांपूर्वीच ओपीडीचे ऑडिट झाले असून मार्च २०२१ पर्यंत तृटीची पूर्तता करण्यासंदर्भात पत्र मिळाले आहे. रुग्णालयाच्या विद्युतीकरणासाठी डीपीडीसीमार्फत २२ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यातून तृटींची पूर्तता केली जात आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास येईल. रुग्णालयात दर सहा महिन्यांनी फायर मॉक ड्रिल केले जाते.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला
जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्यानुसार, अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रदेखील दोन्ही रुग्णालयांकडे नाही. शनिवारी सकाळीच सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी केली असता, येथील एकाच इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा दिसून आली, मात्र यंत्रणेमधील पाण्याच्या टाकीत पाणीच नसल्याचे आढळून आले. हा प्रकार गंभीर आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेला नोटीस देण्यात येईल.
- मनिश कथले, प्रभारी अग्निशमन अधिकारी, मनपा अकोला