विशेष खबरदारीमुळे एचआयव्हीबाधित कोरोनापासून दूरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:00+5:302021-05-18T04:20:00+5:30
अशी बाळगताहेत सावधगिरी कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर, नियमित हात धुणे इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे, शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत आहेत. ...
अशी बाळगताहेत सावधगिरी
कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर, नियमित हात धुणे
इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे, शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत आहेत.
तसेच नियमित औषधोपचार घेत आहेत.
एचआयव्हीची औषध ठरतेय प्रभावी
रोगप्रतिकारकशक्ती टिकून राहावी, म्हणून एचआयव्ही बाधित रुग्णांना नियमित औषधे घ्यावी लागते. या औषधांमुळे एचआयव्ही बाधितांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते. त्यामुळे कोरोनासारख्या विषाणूंचा संसर्ग होण्याची तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता कमी राहत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एचआयव्ही बाधित रुग्ण - ५३४८
एचआयव्ही बाधित कोविड रुग्ण - ०६
एचआयव्ही बाधितांनी कोरोना काळात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील रुग्ण तशी खबरदारी घेत आहेत, त्यामुळेच त्यांच्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण कमी आहे. या रुग्णांवर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधोपचार सुरू आहे, त्याचाही फायदा होत असल्याचे दिसून येते.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला