लाचखोर अधिकाऱ्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:26 PM2020-07-20T17:26:12+5:302020-07-20T17:26:25+5:30

दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला.

The stay of corrupt officials in prisons increased | लाचखोर अधिकाऱ्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

लाचखोर अधिकाऱ्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

googlenewsNext

अकोला : सहकार विभागाचा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे आणि त्याचा लाचखोर साथीदार विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमर सेठी या दोघांच्या जामीन अर्जावर २० जुलै रोजी असलेली सुनावणी आता ३ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला.
अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या सचिवासह त्यांच्या अधीनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाची निश्चिती लागू करण्यासाठी तसेच थकबाकीची रक्कम देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना या दोघांनाही २ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेव्हापासून हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

Web Title: The stay of corrupt officials in prisons increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.