अकोल्यात गृहराज्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:56 PM2017-11-11T17:56:35+5:302017-11-11T18:29:18+5:30

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात रहिवासी असलेल्या तसेच गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय साहाय्यक रविंद्र लोखंडे यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून तब्बल ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उजेडात आली.

Stealing at the residence of the minister's assistant in Akola | अकोल्यात गृहराज्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या घरी चोरी

अकोल्यात गृहराज्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या घरी चोरी

Next
ठळक मुद्देरोखसह मुद्देमाल लंपास, चारचाकी वाहनाने आले चोरटे

- सचिन राऊत

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात रहिवासी असलेल्या तसेच गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय साहाय्यक रविंद्र लोखंडे यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून तब्बल ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उजेडात आली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय साहाय्यक रविंद्र लोखंडे हे मलकापूर परिसरात रहिवासी आहेत. ते गृहराज्यमंत्री यांच्यासोबत असतांना त्यांच्या घरी चारचाकी वाहनामध्ये आलेल्या अज्ञात चोरटयांनी प्रवेश केला, त्यानंतर घरामधील कपाट फोडून रोखरक्कम व मुद्देमाल लंपास केला आहे. लोखंडे यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार त्यांच्या घरातील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. सदर चोरटे एका टाटा सुमो वाहनामध्ये आल्याचेही सांगण्यात येत असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. या घरफोडीनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून चौका-चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Stealing at the residence of the minister's assistant in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.