खारपाणपट्टय़ातील पाण्याचा पशुधनावर विपरीत परिणाम!

By admin | Published: April 2, 2015 01:59 AM2015-04-02T01:59:38+5:302015-04-02T01:59:38+5:30

प्राथमिक संशोधन झाले, कायमस्वरू पी संशोधनाकडे दुर्लक्ष.

Sterilization of water from the saltwater farm! | खारपाणपट्टय़ातील पाण्याचा पशुधनावर विपरीत परिणाम!

खारपाणपट्टय़ातील पाण्याचा पशुधनावर विपरीत परिणाम!

Next

राजरत्न सिरसाट /अकोला: पश्‍चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ातील अतिशय अल्कधर्मी व खार्‍या पाण्याच्या सेवनामुळे या भागातील पशुधन आणि कोंबड्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे; तथापि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या भागातील पशुधनावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र मिळणे कठीण झाले आहे. पश्‍चिम विदर्भात ७५00 चौरस किमी क्षेत्रात पूर्णा नदी विस्तारली असून, या नदीच्या क्षेत्रातील चार हजार चौरस किमीवरील ८९४ गावे खारपाणपट्टय़ात मोडतात. या खारपाणपट्टय़ातील पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असल्याने पशू आणि पक्ष्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा अभ्यास अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी केला आहे. खारे पाणी आणि मिठाची विषबाधा या दोहोंचा कोंबडीवर्गीय पक्ष्यांच्या पांढर्‍या पेशीच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले, तर पशुधनात यकृताचे आजार दिसून आले. चयापचयाच्या अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर भागातील विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करू न पशुधनाची माहिती गोळा केली आहे. या सर्वेक्षणात मुख्यत्वे उन्हाळ्यात पशूंमध्ये किडनीचे आजार दिसून आले आहेत. त्यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचेही निष्पन्न झाले आहे. जनावरांमध्ये पाण्यात विरघळलेले क्षार हे साधारणत: ५00 टीडीएस असतात. खारपाणपट्टय़ातील पशूंमध्ये हे प्रमाण ६000 टीडीएस म्हणजे दहापट दिसून आले आहे. यावर संशोधन करण्यासाठी अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेला स्वतंत्र संशोधन केंद्र देण्याची मागणी होत आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Sterilization of water from the saltwater farm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.