दिवसाढवळय़ा झालेल्या दोन चोर्‍यांचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:36 AM2017-09-18T01:36:31+5:302017-09-18T01:36:31+5:30

तापडिया नगरातील पवनसुत अपार्टमेंटमध्ये व  दुर्गा चौकातील एका घरात १३ सप्टेंबर रोजी भरदुपारी  झालेल्या चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शेगाव तालु क्यातील भोनगाव येथून अटक केली.

The stick of the two thieves of the day | दिवसाढवळय़ा झालेल्या दोन चोर्‍यांचा छडा

दिवसाढवळय़ा झालेल्या दोन चोर्‍यांचा छडा

Next
ठळक मुद्दे१३ सप्टेंबर रोजी भरदुपारी  झालेल्या चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तापडिया नगरातील पवनसुत अपार्टमेंटमध्ये व  दुर्गा चौकातील एका घरात १३ सप्टेंबर रोजी भरदुपारी  झालेल्या चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शेगाव तालु क्यातील भोनगाव येथून अटक केली.
रामदासपेठ पोलीस ठाण्यातील संजय दयाराम चौधरी हे प त्नीसह बाहेरगावी गेले होते. दुपारी त्यांच्या घरी अज्ञात  चोरट्याने प्रवेश करून घरातून ६२ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले होते, तर यापूर्वी सकाळी ११  वाजता दुर्गा चौकातील प्रमिला राजकुमार थोटे या शेतीच्या  कामासाठी बाहेर गेल्या असताना त्यांच्या जानकी अ पार्टमेंटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ३६  हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. 
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हो ता. पोलिसांनी शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील मंगेश  दिलीप पहुरकर (२२) याला अटक केली. त्याची सखोल  चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी  आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१  सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  चोरट्याकडून आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची श क्यता आहे.

गीतानगरमध्ये घरफोडी
गीतानगरातील भरतीया भवनजवळ असलेल्या नावकार अ पार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री चोरी करीत  दोन सोन्याच्या साखळय़ा व चांदीचे दागिने लंपास केल्याची  घटना रविवारी उजेडात आली. या प्रकरणात अज्ञात  चोरट्यांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीतानगरमध्ये  असलेल्या नावकार अपार्टमेंटमध्ये पंकज पनपालिया हे  रहिवासी आहेत. ते शनिवारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले  असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून एक  चांदीचे ताट, एक चांदीची वाटी व सोन्याच्या दोन चेन, असा  हजारो रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला. या  घटनेची माहिती मिळताच जुने शहरचे ठाणेदार विनोद ठाकरे  यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर  या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून  चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: The stick of the two thieves of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.