बाळापूरराेडवरून दारूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:20+5:302020-12-14T04:32:20+5:30
जुने शहर हद्दीतील हॉटेल तुषारसमोरील बाळापूररोडवरून अक्षय देवलाल दंदी ( वय २१, रा. रिधोरा) व स्वराज अरुण इंगळे (वय ...
जुने शहर हद्दीतील हॉटेल तुषारसमोरील बाळापूररोडवरून अक्षय देवलाल दंदी ( वय २१, रा. रिधोरा) व स्वराज अरुण इंगळे (वय २१, रा रिधोरा) हे दाेघे जण देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री व वाहतूक करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून दाेघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून एमएच ३० बीके ६०५५ क्रमांकाची दुचाकी व मुद्देमाल असा एकून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दाेघांविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.