जेतवन नगरमधून दारूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:58+5:302021-04-27T04:18:58+5:30
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जेतवन नगर येथे एका घरातून दारूची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात विक्री करीत ...
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जेतवन नगर येथे एका घरातून दारूची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने सोमवारी छापा टाकून सुमारे पाच हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
जेतवन नगर येथील रहिवासी सुभाष जाधव हा त्याच्या राहत्या घरातून देशी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने पाळत ठेवून सुभाष जाधव यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे पाच हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली.