कापशी येथून दारुचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:14+5:302021-05-24T04:17:14+5:30
अकोला : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी येथे देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करत असलेल्या आरोपीला ...
अकोला : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी येथे देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करत असलेल्या आरोपीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कापशी येथील रहिवासी संजय भीमराव तिडके (वय ३३ वर्षे) हा या परिसरात देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी सापळा रचून संदीप तिडके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी व विदेशी दारूसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.