बाळापुरात घेतला भरधाव कारने पेट!
By Admin | Published: May 8, 2017 02:41 AM2017-05-08T02:41:17+5:302017-05-08T02:41:17+5:30
पुलाजवळील भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बाळापूर : येथील महेश नदीच्या पुलावर ७ मे रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास एक भरधाव मारुती कार अचानक पेटली. तथापि, उपस्थित लोकांच्या मदतीमुळे सदर आग थोड्याच वेळात विझली व ती कार तिथून वेगाने निघून गेली.बाळापूर शहरातून खामगावकडे जाणारी मारुती ओम्नी कार रविवारी दुपारी अचानक पेटल्यामुळे पुलाजवळील भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मारुती कारला लागलेली आग विझविण्याकरिता परिसरातील अनेक लोक धावून गेले. कुणी बादल्या भरून पाणी आणून आगीवर टाकत होते, तर कुणी जवळील माती आणून फेकत होते. एक तरुण ओल्या केलेल्या कपड्याने आग विझविण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर या प्रयत्नामुळे कारला लागलेली आग थोड्याच वेळात विझली. तेथे उपस्थित असलेल्यांनी सदर कार विनानंबरची होती, अशी माहिती दिली. या घटनेबाबत बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये विचारणा केली असता याबाबत आम्हाला कसलीही माहिती अथवा तक्रार नसल्याचे उत्तर देण्यात आले. ती कार कुणाची होती व ती अचानक का पेटली, याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. (तालुका प्रतिनिधी) नगरात खैर मोहम्मद प्लॉटमध्ये राहणारे अब्दुल कादर जमीनदार हे अनेक वर्षांंपासून जुल्फकार दग्र्यावर सेवा देत आहेत. त्यांनी दग्र्याच्या मागील जागेत जवळपास १२0 वृक्ष लावले. या वृक्षांना ते सकाळी नियमित पाणी घालतात आणि साफसफाईचे काम करतात; परंतु या जागेवर गुंडप्रवृत्तीचे काही लोक गांजा पितात आणि म्हशी बांधतात. रविवारी सकाळी बंटी दारूवाला नामक इसमासह काही लोक जागेवरील झाडे तोडीत होते. त्यांना झाडे तोडण्यास अब्दुल कादर यांनी विरोध केला. त्यांच्या विरोधाला न जुमानता आरोपींनी झाडे तोडली आणि अब्दुल कादर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात तक्रार देण्यात आली नाही.