दगडफेकीतील आरोपींना कोठडी
By admin | Published: September 13, 2014 01:05 AM2014-09-13T01:05:16+5:302014-09-13T01:05:16+5:30
दगडफेक करणार्या चार आरोपीं न्यायालयात हजर;आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी.
अकोला : किरकोळ वादातून शास्त्रीनगरातील घरांवर दगडफेक करणार्या चार आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी शास्त्रीनगरातील मोहम्मद निसार मोहम्मद जब्बार, मोहम्मद मुबारीक मोहम्मद युनूस, आसिफ अहेमद इस्तेयाक अहेमद, मोहम्मद शोएब मोहम्मद मजर यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. शुक्रवारी दुपारी खदानचे पीएसआय टिकाराम थाटकर यांनी आरो पींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगरातील काही युवक गणपती विसर्जनासाठी जात असता, त्यांना एका गटाने त्यांच्या गल्लीतून गणपती नेण्यास विरोध केल्याने युवकांनी दुसर्या मार्गाने गणपती नेला. त्यामुळे वातावरण निवळले होते; परंतु बुधवारी सायंकाळी हा तपंपावर पाणी भरण्याच्या कारणावरून काही महिलांमध्ये वाद झाल्याचे निमित्त पुढे करून खदान भागातील ५0 ते ६0 युवकांनी वाद उकरून काढला आणि शास्त्रीनगर भागातील काही घरांवर दगडफेक केली.