बँकांचे विलीनीकरण थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:33 AM2017-10-16T02:33:14+5:302017-10-16T02:34:00+5:30
बँकांचे विलीनीकरण करण्याचा शासनाने निर्णय घे तला असून, त्यामुळे बँक कर्मचार्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे बँकांचे विलीनीकरण थांबवा, अशी मागणी करणारे निवेदन ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज युनियन’ (एआयबीईए) च्यावतीने अकोला येथे आलेले माजी अर्थमंत्री व भाजप नेते यशवंत सिन्हा यांना देण्यात आले.
अकोला : बँकांचे विलीनीकरण करण्याचा शासनाने निर्णय घे तला असून, त्यामुळे बँक कर्मचार्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे बँकांचे विलीनीकरण थांबवा, अशी मागणी करणारे निवेदन ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज युनियन’ (एआयबीईए) च्यावतीने अकोला येथे आलेले माजी अर्थमंत्री व भाजप नेते यशवंत सिन्हा यांना देण्यात आले. जागतिक मंदी असताना बँकांचे विलीनीकरण व ‘जीएसटी’सारखे निर्णय अयोग्य असल्याचे मत यशवंत सिन्हा यांनी एआयबीईएच्या पदाधिकार्यांशी बोलताना व्यक्त केले. निवेदन सादर करणार्या शिष्टमंडळात अध्यक्ष श्याम माईंकर, प्रवीण महाजन, संजय पाठक, अनिल मावळे, राजेश गंकर, अनिल बेलोकर, प्रदीप देशपांडे, राजेश मिश्रा, देवलाल सिरसात, शैलेश कुळकर्णी, बाळासाहेब बैयये, आलोक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.