घरगुती व कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:29+5:302021-03-23T04:19:29+5:30
गतवर्षी लॉकडाऊन काळात घरगुती ग्राहकांना सरासरी आकाराने वाढीव बिले देण्यात आली. लॉकडाऊनमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असताना शासनाने वीज दरवाढ ...
गतवर्षी लॉकडाऊन काळात घरगुती ग्राहकांना सरासरी आकाराने वाढीव बिले देण्यात आली. लॉकडाऊनमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असताना शासनाने वीज दरवाढ केली. थकीत बिले भरण्यास असमर्थ ठरलेल्या ग्राहकांची वीजकपात करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचाही वीजपुरवठा कोणतीही सूचना न देता खंडित करण्यात येत आहे. महावितरणने सुरू केलेली ही मोहीम तत्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना ताई मसने, तेजराव थोरात, माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, डॉ.विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, अंबादास उमाळे, राजेंद्र गिरी, संतोष पांडे, गणेश अंधारे, नीलेश मोरे, देवाशिष काकड, प्रवीण हगवणे, संजय बडोणे, संजय गोडफोडे, चंदा शर्मा, अमोल गोगे, विठ्ठल चतरकार, अश्विनी हातवळणे, तुषार भिरड, धनंजय धबाले, वैकुंठ ढोरे, मुरलीधर भटकर, मनीराम टाले, शंकरराव वाकुडे, अभिमन्यू नळकांडे, हरीश गोंडचवर, ज्ञानेश्वर कडू, अक्षय जोशी सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता पवन कछोट यांनी शिष्टमंडळाने सांगितलेल्या ग्रामीण भागातील व शहरी भागातील समस्या जाणून घेतल्या व वीजपुरवठा पूर्ववत सुरू राहील तसेच कृषिपंप धारक व ग्रामीण भाग व शहरी भागातील वीज बिलाची हप्ते पाडून देण्यासाठी आदेश देण्यात येईल, असे अभिवचन दिले.