अकोला जिल्ह्यात वापर नसलेल्या ५०९ कार्डधारकांना स्वस्त धान्य देणे बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 10:54 AM2020-11-25T10:54:09+5:302020-11-25T10:54:28+5:30
Akola News संबंधित शिधापित्रकाधारकांना (कार्डधारकांना) स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देणे बंद करण्यात आले आहे.
अकोला: सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या शिधापत्रिकांची नावे प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेच्या यादीतून कमी करण्यात येत आहेत. त्यामध्ये स्वस्त धान्यासाठी वापर नसलेल्या जिल्ह्यातील ५०९ शिधापत्रिका ऑक्टोबर अखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या असून, संबंधित शिधापित्रकाधारकांना (कार्डधारकांना) स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देणे बंद करण्यात आले आहे.
सार्वजिनक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय अन्न योजना व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव धान्य दुकानांमधून दरमहा धान्य वितरित करण्यात येते. सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या प्राधान्य गट , अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्यात येत आहेत. गत जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात वापरात नसलेल्या ५०९ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, संबंधित शिधापत्रिकाधारकांना स्वस्तभाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थतीत प्राधान्य गट, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत व एपीएल शेतकरी २ लाख ९३ हजार ५८९ शिधापत्रिकाधारक १३ लाख १९ हजार ८०० लाभार्थींना दरमहा स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत दहा महिन्यांच्या कालावधीत ५०९ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, संबंधित शिधापत्रिकाधारकांना स्वस्त भाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण बंद करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ९३ हजार ५८९ शिधापत्रिकाधारक १३ लाख १९ हजार ८०० शिधापत्रिकाधारक लाभार्थींना स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येत आहे.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.