लसीकरण स्थळी ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:29+5:302021-05-17T04:16:29+5:30

............ कोरोनाबाधित कुटुंबांना ग्रामसेविकेने दिला आधार अकोला : तालुक्यातील येळवण या छोट्याशा गावात आतापर्यंत ७२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. ...

Stop neglecting senior citizens at the vaccination site | लसीकरण स्थळी ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबवा

लसीकरण स्थळी ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबवा

Next

............

कोरोनाबाधित कुटुंबांना ग्रामसेविकेने दिला आधार

अकोला : तालुक्यातील येळवण या छोट्याशा गावात आतापर्यंत ७२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. सर्व कुटुंब गरीब आणि मजुरी करणारे असल्याने त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यावर ग्रामसेविका ज्योती आठवले यांनी त्यांना मदतीचा हात देत त्या ७० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या गावात जवळपास ७२ रुग्णांना लागण झाली. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी ३० जणांना क्वारंटाईन केले आहे. या सर्व कुटुंबांतील सदस्यांना गावात फिरणे प्रतिबंधित आहे. तसेच कठोर निर्बंधामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यावर उपाय तसेच सामाजिक दायित्व म्हणून ग्रामसेविका ज्योती मधुकर आठवले यांनी त्या सर्व कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी साहित्य वाटप केले.

............

भाजपा युवा मोर्चातर्फे मास्कचे वाटप

अकाेला : भारतीय जनता युवा माेर्चाच्या उत्तर मंडळच्या वतिने मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्तर मंडल अध्यक्ष शंकर जयराज (टोनी) सरचिटणीस राजू पर्वते योगेश पाल दर्शन जी शर्मा गायकवाड नितीन राऊत अविनाश जाधव बबलू ओव्हाळ बल्लू चौधरी उपस्थित होते

.......................

लसीकरणाच्या ठिकाणी पाणपोई

अकोला श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतिने शहरामध्ये स्थानिक राधादेवी तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरात लसीकरणाच्या ठिकाणी पानपोई ची व्यवस्था करण्यात आली. व्यवस्थेसाठी संस्थेचे अध्यक्ष सुमन देवी अग्रवाल विजय अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी एडवोकेट राजेश देशपांडे कल्याण शेवटी या मनिष शहा यांनी पुढाकार घेतला.

..........................

विहिपच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

अकोला-राज्यात करोना रुग्ण संख्या वाढत असताना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांत सेवा विभाग संचालित जनजागृती विकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महानगरात गरजू करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपकरणाचा प्रारंभ स्थानीय उत्कर्ष शिशुगृहात अक्षय तृतीयेच्या पर्वावर संपन्न झाला.उत्कर्ष शिशू संस्थेचे अध्यक्ष विजय जानी व सुनील नंद यांच्या हस्ते या कॉन्सट्रेटर उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी विदर्भ प्रांत सेवा प्रमुख गणेश काळकर , विहिंपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढिया, मंत्री प्रकाश घोगलिया, विदर्भ सेवा प्रमुख गणेश काळकर, जिल्हा सेवा प्रमुख मंगेश दीक्षित, दादा पंत, हेमंत चौधरी, सुधाकर गीते, राहुल महाशब्दे, विनोद जकाते,डॉ किशोर नागे, मीरा जोशी, अश्विनी सुजतेकर,वैशाली भटकर,राहुल वैराळे,कु. प्रीती दांदळे, कु. भाग्यश्री घाटे आदी उपस्थित होते.

..........................

करोना नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर करा

अकोला.. जिल्ह्यात करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला असून शासन, प्रशासन या संदर्भात जोमाने उपाय योजना राबवून करोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कोणत्या उपाययोजना राबविल्या व व्यवस्थापनाच्या कसा आढावा घेतला ही माहिती जनतेला देण्याची मागणी जमात-ए-इस्लामी हिंद अकोला शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात नमुद केले आहे की, करोना बाबतच्या विशेष योजना व बजट पूर्णपणे खर्च झाला की नाही,करोना नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या,गोरगरिबांना शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला त्याचा परिपूर्ण तपशील,जिल्हा रुग्णालयात अभ्यागत समितीच्यावतीने करण्यात येणारी मीमांसा व करोना रुग्णासाठी कोणकोणत्या शासकीय सवलती यांची माहिती प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणीही जमात-ए-इस्लामीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.जमातच्या वतीने एक कृतिशील टाक्स फॉर्सची निर्मिती करण्यात आली असून डॉ.रुजू अहमद यांच्या नियंत्रणात यामध्ये जमात-ए -इस्लामी हिंदचे प्रभारी हामिद हुसेन ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकार, डॉ.नगर शेख, डॉ. मुदस्सीर,रिजवान अहमद खान, मो. नाजीम,करीम सर डॉ.अहमद खान,शहजाद अन्वर,नजीब रहेमान,राहुल इंगळे, सय्यद नदीम,मो.इर्शाद, आजम नबील, गुफ्रान काझी.मो.असिफ आदींचा समावेश करण्यात आला असून ही समिती सामाजिक कार्य करीत असल्याची माहिती ही निवेदनात नमूद करण्यात आली.

Web Title: Stop neglecting senior citizens at the vaccination site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.