जिभेचे लाड थांबवा, तिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:46+5:302021-09-03T04:19:46+5:30
अकाेला : अपचन किंवा छातीत जळजळ अशा समस्या जाणवत असतील पाेट दुखत असेल तर दुर्लक्ष नकाे आपणास ...
अकाेला : अपचन किंवा छातीत जळजळ अशा समस्या जाणवत असतील पाेट दुखत असेल तर दुर्लक्ष नकाे आपणास अल्सरही असू शकतो. केवळ जिभेवर ताबा ठेवून तिखट आणि मसालेदार पदार्थांंचे अतिसेवन अल्सरला कारणीभूत ठरू शकते.
अल्सरची प्रारंभी जाणवणारी लक्षणे अगदीच किरकाेळ असतात मात्र त्या लक्षणांकडेही दुर्लक्ष केले तर पुढे त्रासदायक ठरू शकते. मुळातच हा आजार हॅलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या जिवाणूच्या संसर्गामुळेदेखील हाेऊ होतो. शरीरातील आम्ल वाढल्यामुळे अल्सरचा धाेका होतो. आम्ल आपल्या चुकीच्या आहारामुळे तयार हाेते. तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर शरीरातील आम्ल वाढत जाते. हे आम्ल लहान आतड्याच्या वरच्या भागावर जखमा करते. धूम्रपान, स्टेरॉइडचा वापर, वारंवार मद्यपान केल्याने अल्सर होण्याचा धोका वाढू शकतो.
अशी आहेत लक्षणे
सतत आळस येणं
पोटात जळजळ होणं
अपचन, पोटदुखी
वारंवार आंबट ढेकर
कधी कधी उलटी हाेणे
थकवा जाणवणे, चक्कर येणे
काय काळजी घेणार
तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळून आहारात बदल करावा लागतो. सतत पाेटदुखीवर घरगुती उपाय करण्यापेक्षा अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. जीवनसत्त्व युक्त आहार आणि जोडीला रोजच्या जगण्यातील ताणतणावावर नियंत्रण ठेवल्यास खूप फायदा होतो.
धूम्रपान, मद्यपान बंद केले पाहिजे. रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी. वारंवार वेदनाशामक गोळ्या घेण्याची सवय बंद केली पाहिजे.
अल्सर हा आजार हळूहळू वाढताे. याेग्य आहार, घेतला तर अल्सर टाळता येऊ शकताे, मात्र साैम्य लक्षणे असली तरी दुर्लक्ष करणे घातक ठरते, वेळीच तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे
डाॅ. जिशान हुसेन