बोरगाव मंजूत संतप्त शेतकर्यांचा ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:20 AM2017-08-05T02:20:23+5:302017-08-05T02:20:43+5:30
बोरगाव मंजू : शासनाच्या पंतप्रधान पीक विम्याची वेबसाइट मागील काही दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्यामुळे संत प्त झालेल्या परिसरातील शेतकर्यांनी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू ग्रामपंचायतसमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणार्या १९ शे तकर्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क

पंतप्रधान पीक विमा काढण्याची वेबसाइट वारंवार बंद पडत असल्याने या शेतकर्यांना ऑनलाइन पीक विमा न काढता रिकाम्या हातांनी घरी परत जावे लागत होते. बोरगाव मंजू परिसरातील गावांमधील शेतकर्यांनी ४ ऑगस्ट रोजी येथील सुविधा केंद्रावर मोठय़ा संख्येने गर्दी केली; परंतु पीक विम्याची वेबसाइट सतत बंद पडत असल्यामुळे ठरलेल्या मुदतीत पीक विमा निघत नसल्याचे व नाहक त्रास होत असल्याचे पाहून बोरगाव मंजूसह परिसरातील शेतकरी संतप्त झाले.
या शेतकर्यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतकरी नेते गजानन देशमुख यांच्या नेतृत्वात शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करीत ग्रामपंचायतसमोर महामार्गावर काही काळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी या बाबीची वेळीच दखल घेऊन संतप्त शेतकर्यांची समजूत घालून त्यांना शांत केले. त्यापैकी आंदोलन करणार्या १९ शेतकर्यांना पोलिसांनी सीआरपीसीच्या ६८ कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेऊन नं तर कलम ६९ अन्वये सोडून दिले.