वादळाचा घरांना तडाखा, अकोटात झाडे उन्मळून पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:53+5:302021-05-20T04:19:53+5:30
अकोटात १९ मे रोजी रात्री वादळी, वारा विजेच्या गडगडाटसह जोरदार पाऊस झाला. यात्रा चौक, न्यायाधीश निवासस्थान, सोमवार वेस, बसस्थानक ...
अकोटात १९ मे रोजी रात्री वादळी, वारा विजेच्या गडगडाटसह जोरदार पाऊस झाला. यात्रा चौक, न्यायाधीश निवासस्थान, सोमवार वेस, बसस्थानक परिसर, बस स्टँडरोड, अकोला रोड, नेहरू पार्क, लोहारी मार्ग श्री काॅलनी, नयाप्रेस, दर्यापूर रोड चर्चसमोर आदी भागात झाडे पडली. अनेक घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. एमआयडीसीमधील धाब्याचे टिनपत्रे उडाले. बर्डे प्लॉटमधील दोन घरांवरील पूर्ण उडून गेली. दर्यापूर रोडवरील शिव मंगल कार्यालयावरील वीस ते पंचवीस फूट टिनपत्र्याचा तक्ता उडून जात शाळेवर पडला.
वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे शहर अंधारात होते. रात्रभर वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी काही भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. दिवसभर काही परिसरात विद्युत पुरवठा बंद पडल्याने वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. नगरपरिषदेचे अभियंता, कर्मचारी यांनी रात्रभर रस्त्यावर झाडे हटविण्यासाठी जेसीबी आणले. कटाई करीत रस्ते व घरावरची पडलेली झाडे काढली. कालवाडी मार्गावर भूषण दौड यांच्या म्हशीच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने तालुक्यातील व शहरातील नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.
फोटो:
तक्रार देऊन दुर्लक्ष करणे भोवले
टाकपुरा भागातील एक झाड पडण्याच्या स्थितीत आहे. या झाडाखालून लोकांची नेहमीच वर्दळ असते. झाडाजवळ वस्ती असून झाड केव्हाही पडू शकते. जीवितहानी होण्याची शक्यता पाहता नगरपरिषदेने झाड लवकर तोडावे, अशी लेखी तक्रार परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. परंतु, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर कालच्या वादळात हे झाड एका घरावर पडले. सुदैवाने नागरिकांनी धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.