अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; २८६ घरांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:56 PM2018-06-07T14:56:46+5:302018-06-07T14:56:46+5:30

अकोला : वादळी पावसाच्या तडाख्यात ५ जून रोजी जिल्ह्यातील अकोला व बाळापूर या दोन तालुक्यात २८६ घरांचे नुकसान झाले.

Stormy monsoon rains in Akola district; 286 home losses! | अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; २८६ घरांचे नुकसान !

अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; २८६ घरांचे नुकसान !

Next
ठळक मुद्देवादळी पावसाच्या तडाख्यात अकोला शहरासह अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांत घरांचे नुकसान झाले.अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.


अकोला : वादळी पावसाच्या तडाख्यात ५ जून रोजी जिल्ह्यातील अकोला व बाळापूर या दोन तालुक्यात २८६ घरांचे नुकसान झाले. नुकसानाचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
मंगळवार, ५ जून रोजी जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस बरसला. वादळी पावसाच्या तडाख्यात अकोला शहरासह अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांत घरांचे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाली असून, कवेलू फुटले, तसेच काही घरांची पडझड झाली आहे. अकोला व बाळापूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन्ही तालुक्यात २८६ घरांचे अंशत: नुकसान झाले. दोन्ही तालुक्यातील घरांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ६ जून रोजी सायंकाळी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

दोन तालुक्यात घरांचे अंशत: असे झाले नुकसान!
तालुका                      घरे
अकोला                     २००
बाळापूर                     ८६
............................................
एकूण                           २८६

 

Web Title: Stormy monsoon rains in Akola district; 286 home losses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.