अकोला बसस्थानकात साचले पाणी; प्रवासी त्रस्त

By Admin | Published: November 16, 2014 12:57 AM2014-11-16T00:57:17+5:302014-11-16T00:57:17+5:30

एसटी प्रशासनाचे होत आहे समस्येकडे दुर्लक्ष.

Stormy water in Akola bus stand; The stranger suffers | अकोला बसस्थानकात साचले पाणी; प्रवासी त्रस्त

अकोला बसस्थानकात साचले पाणी; प्रवासी त्रस्त

googlenewsNext

अकोला: शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे बसस्थानक परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना त्रास सहन करावा लागला.
शनिवारी सकाळी जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाचे पाणी बसस्थानक परिसरात साचले. खामगाव, औरंगाबाद या शहरांकडे जाणार्‍या बस याच परिसरात थांबतात. दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. बस थांबण्याच्या ठिकाणीच पाणी साचले असल्याने बसमधून उतरताना व चढताना प्रवाशांना त्रास होत होता. सकाळी पाची साचले असल्याचे निदर्शनास आल्यावरही एस.टी. प्रशासनाच्यावतीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर दुपारी तीन वाजेपर्यंत बसस्थानकात पाणी साचलेले होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी या प्रकरणाची तक्रारही केली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. एस.टी. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचणारच नाही, याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली.

Web Title: Stormy water in Akola bus stand; The stranger suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.