कथेत ग्रामीण जनमानसाचे प्रतिबिंब गरजेचे- प्रतिमा इंगाेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:53 AM2021-02-20T04:53:01+5:302021-02-20T04:53:01+5:30
अकोला : ग्रामीण साहित्य हे जगासमाेर वास्तव मांडणारे असले पाहिजे. कथेत ग्रामीण जनमानसाचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ...
अकोला : ग्रामीण साहित्य हे जगासमाेर वास्तव मांडणारे असले पाहिजे. कथेत ग्रामीण जनमानसाचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमाताई इंगाेले यांनी केले. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी जागर सभागृहात रविवारी आयाेजित परिसंवादात अध्यक्षीय भाषणात त्या बाेलत हाेत्या.
प्रसिद्ध लेखक, ग्रामीण कथाकार, शिक्षक अमोल गोंडचवर यांच्या ‘पौर्णिमेची चंद्रकोर’ या कथासंग्रहाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. गाेंडचवर यांच्या बहुतांश कथा ग्रामीण जीवनावर, दारिद्र्य, गरिबी व व्यवस्थेबद्दल असलेली चीड यावर आधारित आहेत, असे मत मन्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला अकाेला जिल्हा परिषदेचे बांधकाम, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, तुळशीराम बोबडे, बापूराव झटाले, प्रा. मधुकर वडोदे, प्रा. मोहन काळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन गोपाल मापारी व आभार प्रदर्शन मनोज लेखणार यांनी केले.