एसटी कर्मचार्‍यांचे टप्पेवारी आंदोलन; २५ जानेवारीला करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 09:34 PM2018-01-19T21:34:20+5:302018-01-19T21:59:37+5:30

अकोला: उच्च स्तरीय समितीचा प्रस्ताव अमान्य करीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी २५ जानेवारीपासून राज्यभरात टप्पेवारी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. २५  जानेवारी रोजी उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची राज्यातील प्रत्येक आगारासमोर होळी करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचारी सहकुंटुंब आक्रोश आंदोलन करणार आहे. त्यानंतर बेमुदत संपाची घोषणा करण्यात येईल. असा कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर जाहिर करण्यात आला.

STP employees from January 25 | एसटी कर्मचार्‍यांचे टप्पेवारी आंदोलन; २५ जानेवारीला करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी!

एसटी कर्मचार्‍यांचे टप्पेवारी आंदोलन; २५ जानेवारीला करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी!

Next
ठळक मुद्दे२५ जानेवारीला राज्यभरातील आगारांमध्ये करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी ९ फेब्रुवारीला सहकुंटुंब आक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: उच्च स्तरीय समितीचा प्रस्ताव अमान्य करीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी २५ जानेवारीपासून राज्यभरात टप्पेवारी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. २५  जानेवारी रोजी उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची राज्यातील प्रत्येक आगारासमोर होळी करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचारी सहकुंटुंब आक्रोश आंदोलन करणार आहे. त्यानंतर बेमुदत संपाची घोषणा करण्यात येईल. असा कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर जाहिर करण्यात आला.
 वेतन वाढ पोटी १0७६  कोटींचा शासनाचा  प्रस्ताव कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने फेटाळून लावित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी  मध्यतंरी चार दिवस चक्काजाम  केला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली. दरम्यान या समितीने वेतन पोटी ७४१ कोटींचा प्रस्ताव समोर आणला.  पूर्वीपेक्षाही कमी वेतनवाढ समितीने आणल्याने हा प्रस्ताव कर्मचारी कृती समितीने फेटाळला. दरम्यान कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी मुंबईत बैठक बोलाविली. त्यामध्ये उच्चस्तरीय समितीचा अहवाल निराशाजनक व संतापजनक आहे, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाचे टप्पे आणि भूमिका निश्‍चीत करण्यात आली आहे. आपल्या न्यायहक्कासाठी कर्मचारी कृती समिती गुरुवारी दि.२५ जानेवारी रोजी राज्यभरातील आगारांमध्ये उच्चस्तरीय अहवालाची होळी करणार आहे. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास ९ फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या बैठकीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: STP employees from January 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.