‘एसटीपी’ची जागा अकोला महानगर पालिकेला हस्तांतरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:08 AM2017-12-05T02:08:01+5:302017-12-05T02:10:50+5:30
भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) साठी शिलोडा परिसरातील सहा एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा ताबा देण्याचा आदेश महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला. ‘एसटीपी’ची जागा निश्चित झाल्यामुळे वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) साठी शिलोडा परिसरातील सहा एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा ताबा देण्याचा आदेश महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला. ‘एसटीपी’ची जागा निश्चित झाल्यामुळे वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून शहरात सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य शासनाने ३0 आणि सात एमएलडी असे दोन प्लान्ट उभारण्यासाठी ७९ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले आहेत. मनपा प्रशासनाने ६१ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रकाशित करताना त्यामध्ये ‘एसटीपी’साठी जागेचा समावेश क रणे आवश्यक होते. ‘एसटीपी’च्या जागेशिवाय निविदा मंजूर करण्यात आल्यामुळे योजनेला ‘वर्क ऑर्डर’ देताना प्रशासनासमोर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मनपा प्रशासनाने शिलोडा परिसरातील सहा एकर जागा निश्चित करून, तसा प्रस्ताव सहायक संचालक नगररचना विभागाकडे सादर केला असता, या विभागाने ‘डीपी प्लॅन’वर ‘एसटीपी’साठी जागा निश्चित केली. जागेला हस्तांतरित करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना असल्यामुळे जागेचा ताबा घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जागेचा ताबा देण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.