बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय : कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:41 AM2018-03-13T01:41:39+5:302018-03-13T01:41:39+5:30
अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध केले. याचा अभ्यास करू न पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध केले. याचा अभ्यास करू न पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यात बीटी कापसावरील बोंडअळीचे व्यवस्थापन कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. या कार्यशाळेला राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. या कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांनी बोंडअळीवर दीर्घ चर्चा केली. नेमक्या करावयाच्या उपाययोजना यावर मंथन झाले. या कार्यशाळेत गुजरातच्या आनंद विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.पी.के. बोराड तसेच डॉ. हिमांशू देसाई यांची उपस्थिती होती. त्यांनी गुजरातमध्ये कपाशीवरील बोंडअळीवर केलेले काम, विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यासाठी मात्र शासनाचे पाठबळ मिळाले, असे सांगितले. गुजरात शासनाने एक धोरणात्मक निर्णयच घेतला आहे. बीटी कापसावरील बोंडअळीला कामगंध सापळे प्रभावी नियंत्रण ठरू शकत असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच बोंडअळी येण्याची कारणे, रिफ्यूजी बीटी कापसाचा करावयाचा वापर, बोंडअळीच्या आगमनाची चाहूल, जीवनक्रम, बोंडअळी ओळखणे, बोंडअळीग्रस्त कपाशीची विल्हेवाट कशी लावावी, यासाठीची माहिती शेतकºयांना देण्यात आली. त्याचा फायदा झाला असून, बोंडअळीवर ७० टक्क्याच्यावर नियंत्रण या मार्गाने मिळविण्यात आले.
याच अनुषंगाने गुजरातच्या विविध उपाययोजनांची माहिती व धोरणात्मक निर्णयाचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच या कार्यशाळेत झालेल्या विविध तांत्रिक विषयावरील निष्कर्ष महाराष्टÑ शासनाला सादर करण्यात येणार आहेत.
- कृषी विद्यापीठाने घडीपत्रिका, भित्तीपत्रके तयार केली आहेत. विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणासाठीची माहिती दिली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांनतर आणखी व्यापक कार्यक्रम हाती घेतले जातील.
- डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
- गुुजरात राज्याने केलेल्या बोंडअळीवरील विविध उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येणार असून, कार्यशाळेतील निष्कर्ष व त्यासाठीच्या अंमलबजावणीसाठी शासनाला सादर केले जाणार आहे. तसेच मराठवाड्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिनिंग संचालक, शेतकरी विक्रेत्यांची कार्यशाळा घेणार आहे.
- डॉ. बी. व्यंकटेश्वरलू,कुलगुरू ,स्व. वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.