अकोला शहरात पथदिव्यांचा बोजवारा; मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:25 PM2018-09-17T13:25:22+5:302018-09-17T13:30:05+5:30

अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात असतानाच दुसरीकडे ऐन सणासुदीच्या दिवसांत मुख्य रस्त्यांवरील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर येत आहे.

street lights in Akola city; Neglect of municipality | अकोला शहरात पथदिव्यांचा बोजवारा; मनपाचे दुर्लक्ष

अकोला शहरात पथदिव्यांचा बोजवारा; मनपाचे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, पथदिव्यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. बहुतांश मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद.

अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात असतानाच दुसरीकडे ऐन सणासुदीच्या दिवसांत मुख्य रस्त्यांवरील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर येत आहे. मनपाने झोननिहाय नियुक्त केलेले कंत्राटदार मनमानी करीत आहेत. पथदिव्यांच्या तक्रारींचा खच पाहता महापौर विजय अग्रवाल यांनी विद्युत विभाग प्रमुखांना चांगलेच खडेबोल सुनावल्याची माहिती आहे.
तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शहरातील मुख्य रस्ते असो वा अंतर्गत रस्त्यांवर सोडियम पथदिव्यांचा वापर केला जात होता. सोडियम पथदिव्यांमुळे मनपाच्या वीज देयकांत प्रचंड वाढ होत असल्याची सबब पुढे करीत २००६ मध्ये ‘सीएफएल’ पथदिव्यांना प्राधान्य देण्यात आले. यासाठी प्रशासनाने एशियन नामक कंपनीसोबत २०१३ पर्यंत सीएफएल पथदिव्यांसाठी करारनामा केला होता. महापालिकेच्या वीज देयकात घसरण झाल्याचा दावा केला जात असला, तरी ‘सीएफएल’च्या अंधुक उजेडामुळे अकोलेकर हैराण झाले होते. कंपनीचे देयक थकीत राहत असल्यामुळे कंपनीनेसुद्धा पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी आखडता हात घेतला. यावर उपाय म्हणून ‘एलईडी’ पथदिवे लावण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे निधीची मागणी केली. गतवर्षी ‘एलईडी’साठी शासनाने १० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामध्ये मनपा प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. शहरात रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. एकीकडे शहरात एलईडीच्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, पथदिव्यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. बहुतांश मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेने नियुक्त केलेले कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकाराची मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तातडीने दखल घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

 

Web Title: street lights in Akola city; Neglect of municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.