सहा महिन्यांचे देयक थकीत; पथदिव्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:24 PM2019-03-06T12:24:44+5:302019-03-06T12:24:57+5:30

अकोला : शहरातील पथदिव्यांची यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी मनपा प्रशासनाने पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. संबंधित चारही ...

Street lights; Six month's payment is pending | सहा महिन्यांचे देयक थकीत; पथदिव्यांकडे दुर्लक्ष

सहा महिन्यांचे देयक थकीत; पथदिव्यांकडे दुर्लक्ष

Next

अकोला: शहरातील पथदिव्यांची यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी मनपा प्रशासनाने पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. संबंधित चारही कंत्राटदारांचे मागील सहा महिन्यांचे देयक थकीत असल्यामुळेच पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. देयक थकीत असले तरी ते भविष्यात कंत्राटदारांना अदा केले जाईल. अशा स्थितीत २४ तासांत नादुरुस्त पथदिव्यांच्या तक्रारींचे निरसन न करणाऱ्या कंत्राटदारांना प्रशासनाने दंड आकारणे अपेक्षित असल्याने प्रशासनाने आजवर काय कारवाई केली, याकडे लक्ष लागले आहे.
अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ही मनपाची नैतिक जबाबदारी आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, पदपाथ, दैनंदिन साफसफाईचा समावेश होतो. मागील तीन-चार महिन्यांपासून मूलभूत सुविधांची दानादान उडाल्याचे चित्र आहे. शहराच्या कानाकोपºयात लख्ख उजेड देणारे एलईडी उभारण्याचे काम प्रगतिपथावर असतानाच दुसरीकडे त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. पथदिवे दुरुस्तीसाठी प्रशासनाने झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली असून, महिन्याकाठी किमान १२ लाखांचे देयक अदा केले जाते. संबंधित कंत्राटदारांचे मागील सहा महिन्यांपासून देयक थकीत असल्याची माहिती आहे. देयक थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हात आखडता घेतल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी शहराच्या कानाकोपºयातील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर आले आहे.


२४ तासांत दुरुस्ती नाहीच!
नादुरुस्त पथदिव्यांच्या तक्रारीसाठी मनपात स्वतंत्र कक्ष आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास चोवीस तासाच्या आत तक्रारीचे निरसन होणे अपेक्षित असून, तसा करार कंत्राटदारांसोबत करण्यात आला आहे. याकरिता मनपाने नागरिकांसाठी ८३८०८९४५३८ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार केल्यानंतरही पंधरा-पंधरा दिवस पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नाही, हे येथे उल्लेखनिय.


भाजपला ‘अच्छे दिन’चा विसर!
२०१४ मध्ये मनपात सत्तापरिवर्तन होऊन भाजपाची सत्ता आली. पथदिव्यांच्या उभारणीवर कोट्यवधींचा खर्च होत असला तरी मागील चार वर्षांच्या कालावधीत पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. मनपाच्या विद्युत विभागाचे कंत्राटदारांवर अजिबात नियंत्रण नसल्यामुळे प्रभागातील पथदिवे पंधरा-पंधरा दिवस बंद राहत आहेत. हा प्रकार पाहता अकोलेकरांना ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्ता मिळवणाºया भाजपला स्वत:च्या आश्वासनांचा विसर पडल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.


काम पूर्णत्वाच्या मार्गावर; दुरुस्तीचे काय?
शहरात मे. रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीने मे २०१७ मध्ये एलईडी पथदिवे लावण्याच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. कंपनीकडून संबंधित पथदिव्यांची पाच वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. आजपर्यंत कंपनीने ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून होत असतानाच महामार्गावरील नादुरुस्त पथदिवे कधी दुरुस्त होतील, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

Web Title: Street lights; Six month's payment is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.