काेराेनाच्या ताणावातही आराेग्य यंत्रणेला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:11+5:302020-12-31T04:19:11+5:30

‘व्हीआरडीएल लॅब’ जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित व्हीआरडीएल लॅब कोरोनाच्या निमित्ताने अखेर सुरू झाली. ही लॅब प्रामुख्याने स्वाइन फ्लूसाठी प्रस्तावित ...

Strengthen the health system even in the face of Kareena's stress | काेराेनाच्या ताणावातही आराेग्य यंत्रणेला बळ

काेराेनाच्या ताणावातही आराेग्य यंत्रणेला बळ

Next

‘व्हीआरडीएल लॅब’

जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित व्हीआरडीएल लॅब कोरोनाच्या निमित्ताने अखेर सुरू झाली. ही लॅब प्रामुख्याने स्वाइन फ्लूसाठी प्रस्तावित होती. लॅब सुरू झाल्याने आता कोविडसह स्वाइन फ्लू आणि विषाणूजन्य आजारांचे निदान आता अकोल्यातच शक्य झाले आहे.

प्लाझ्मा युनिट कार्यन्वित

कोविडच्या रुग्णांवर अँटिबॉडीजच्या माध्यमातून उपचार करता यावे, यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील सासकीय रक्तपेढीत प्लाझ्मा फोरेसिस युनिट सुरू करण्यात आले. प्लाझ्मा संकलनासाठी १३ लाख ४० हजार रुपयांची अत्याधुनिक मशीन मिळाली.

सुपरस्पेशालिटीची प्रतीक्षा कायमच

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणेही दाखल झाले आहेत. मात्र, पदनिर्मिती आणि पदभरतीमुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. मध्यंतरी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ८०० पदांना मंजुरी दिली आहे, मात्र त्या पदांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात ठोस निर्णय झाला नाही.

आरोग्य यंत्रणेला हे मिळाले

ऑक्सिजन टँक

७१ व्हेंटिलेटर

पीजी सीट ( नेत्ररोग, स्कीन, स्त्री रोग)

व्हीआरडीएल लॅब

प्लाझ्मा सेंटर

शवविच्छेदन गृहाच्या नव्या इमारतीसाठी निधी मंजूर

टेली आयसीयू

कोविड लसीसाठी ४० क्यूबिक मीटर क्षमतेची ‘वॉक इन कुलर’

Web Title: Strengthen the health system even in the face of Kareena's stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.