जीएमसीवर सुपर स्पेशालिटीचा ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:11+5:302020-12-07T04:13:11+5:30
तांत्रिक पदांचाही भारही जीएमसीवरच मध्यंतरी प्रस्तावित पदांमधून विविध लॅबसह इतर तांत्रिक पदे रद्द करण्यात आली होती. यासाठी शासकीय ...
तांत्रिक पदांचाही भारही जीएमसीवरच
मध्यंतरी प्रस्तावित पदांमधून विविध लॅबसह इतर तांत्रिक पदे रद्द करण्यात आली होती. यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातीलच संसाधनांचा वापर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. सुरुवातीलाच पदांना कात्री लावण्यात आली असताना आता कमी मनुष्यबळात सुपर स्पेशालिटी सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जीएमसीवर मोठा ताण येणार आहे.
वैद्यकीय उपकरणांचे इंस्टॉलेशन नाही
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणे येऊनही वर्ष झाले; परंतु पदांअभावी या उपकरणांचे इंस्टॉलेशन झालेले नाही. मंजूर पदांमध्ये आवश्यक पदांचा समावेश असेल तरच या उपकरणांचे इंस्टॉलेशन करणे शक्य होणार आहे, अन्यथा कोट्यवधींचे उपकरणे धूळ खातच पडणार आहेत.
या विभागांचा समावेश
हृदयरोग चिकित्सा
ऊर शल्य चिकित्सा
मूत्रपिंड चिकित्सा
मूत्ररोग शल्यचिकित्सा
मज्जातंतू शल्यचिकित्सा
नवजात शिशू अतिदक्षता