प्रबोधना सोबत कठोर कार्यवाही करणे आवश्यक! - खासदार संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 05:22 PM2018-04-23T17:22:20+5:302018-04-23T17:25:43+5:30
अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.
अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. वाहतुकीचे नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून रस्त्यावरुन वाहन चालवीताना अपघात टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मोटार वाहन विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांनी आयोजीत केलेल्या २९ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटन श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार रणधीर सावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे वाहतुक पंधरवाडयाचे थिम असुन २३ एप्रिल ते ७ मे २०१८ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या पंधरवाडयात उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी प्रास्तावीकातून दिली. यावेळी श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मार्गदर्शन पुस्तीका ,पोस्टर, स्टिकर्स यांचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नो हॉर्न प्लीज ची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन श्री. घोरपडे यांनी तर उपस्थितांचे आभार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी मानले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी व अधिकारी ,व एन.सी.सी/एन.एस.एस चे विद्यार्थी, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी/विद्यार्थींनी आणि अद्यापक वर्ग उपस्थित होते.
नियम कठोरपणे राबविणे गरजेचे - सावरकर
परिवहन विभागाने वाहतुकीचे नियम कठोरपणे राबविण्याची गरज असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध र दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले. शहरातील महत्वाच्या चौकात रस्त्यांचे कर्व्हेचर मनपाच्या मतदतीने तयार करावे,अशा सुचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या. लायसन्स काढण्याचे प्रणालीमध्ये असलेल्या पारदर्शक पणामुळे लायसन्स काढणे अधिक सोपे झाल्यामुळे त्यांनी या प्रणालीचे कौतुक केले.