नवदुर्गोत्सव, ईद व धम्मचक्र परिवर्तन दिनानीमीत्त तगडा बंदोबस्त; पोलीस अधीक्षकांचा अॅक्शन प्लान
By सचिन राऊत | Published: September 30, 2022 05:12 PM2022-09-30T17:12:04+5:302022-09-30T17:12:12+5:30
साडेतीन हजार पाेलिसांचा फाैजफाटा
अकाेला : नवरात्राेत्सवातील ९ दिवस, त्यानंतर येणारा धम्मचक्र परिवर्तन दिन आणि इद ए मीलाद उत्सवाच्या पृष्ठभुमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पाेलिस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी अॅक्शन प्लान तयार केला आहे़ या दहा दिवसांसाठी जिल्हयात साडेतीन हजारांपेक्षा अधिक पाेलिसांचा फाैजफाटा तैनात करण्यात आला असून साध्या वेशातील पाेलिसही कार्यरत करण्यात आले आहेत.
प्रत्येक पाेलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना मीळणारी माहीती साध्या कपडयातील पाेलिसांकडून तपासण्यात येत आहे़ गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांवर कलम ५५, ५६ व ५७ अन्वये कारवाइ करण्यात येत आहे़ तसेच कुख्यात गुन्हेगारांवर १४४ आणि १४९ अन्वये कारवाइ करण्यात येत असून प्रत्येक पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त सुरु करण्यात आली आहे़ मीश्र वस्ती असलेल्या ठिकाणी विशेष पथक कार्यान्वीत करण्यात आले असून ते प्रत्येक बाबीवर नियंत्रण ठेउन आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांची घरझडती घेउन शस्त्र जप्त करण्यात येत आहे़ शहरासह जिल्हयात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे़ ध्वनी प्रदुषनाचे उल्लंघण हाेणार नाही यासाठी डीजे चालकांवरही लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना तशा सुचना देण्यात आलेल्या आहेत़ पाेस्टर, बॅनर, झेंडे पताका लावण्यासाठी नियम बनवून देण्यात आले आहेत़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या ठिकाणी तात्काळ नियंत्रण मीळविण्यासाठी जलदगती प्रतिसाद दलाची आखणी करण्यात आली आहे.
सहा सीसीटीव्ही व्हॅन ५० बाॅडी कॅमेरे
सायंकाळी गरबा खेळणाऱ्या युवती व महिला बाहेर पडतात यावेळी चेन स्नॅचींग हाेणार नाही यासाठी विशेष पथक व महिला पाेलिस कार्यान्वीत करण्यात आले आहेत़ शहरात सहा सीसीटीव्ही असलेल्या फीरत्या व्हॅन व ५० बाॅडी ऑन कॅमेरे असलेले पाेलिसही कार्यरत आहेत़
असा आहे बंदाेबस्त
पाेलिस अधीक्षक ०१
अपर पाेलिस अधीक्षक ०१
डीवायएसपी ०६
पाेलिस निरीक्षक २३
साहायक पाेलिस निरीक्षक २८
पाेलिस उपनिरीक्षक ६६
पाेलिस अंमलदार २१४३
एसआरपी प्लाटून ०४
आरसीपी प्लाटून व गृहरक्षक दलाचे जवान ८००