मोहम्मद अली रोडवरील दुकानावर बळजबरी ताबा करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:02 AM2017-11-25T02:02:21+5:302017-11-25T02:04:05+5:30
मोहम्मद अली रोडवरील अब्दुल हबीब यांच्या दुकानावर बळजबरी ताबा करणार्या टोळीतील मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९), मंजूर इलाही खान(२९) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोहम्मद अली रोडवरील अब्दुल हबीब यांच्या दुकानावर बळजबरी ताबा करणार्या टोळीतील मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९), मंजूर इलाही खान(२९) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस अब्दुल हबीब यांच्या दुकानावर गुंडांनी बळजबरी ताबा केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दखल घेत संशयित गुंडांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी कोतवाली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मोहम्मद अली रोडवर बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे मुखत्यार म्हणून अब्दुल हबीब यांचे वडील दुकान सांभाळायचे. त्यांच्यानंतर अब्दुल हबीब हे दुकान सांभाळत. शब्बीरभाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांनी हे दुकान परस्पर विकले. सध्या दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्या व्यक्तीने मंजूर इलाही, सफवाद, सलमान आणि इतर ५ ते ६ गुंडांनी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडले आणि दुकानाचा ताबा घेतला, तसेच दुकाना तील साडे चार लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्य ट्रकमध्ये भरून परस्पर लंपास केले. अब्दुल हबीब यांच्या तक्रारीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी कोतवाली पोलिसांनी ४६१, ३८0 आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. शुक्रवारी पोलिसांनी यातील आरोपी मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९ रा. जोगळेकर प्लॉट), मंजूर इलाही खान(२९ रा. लाल बंगला, बैदपुरा) यांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाशी संबंध असलेले उर्वरित आरोपी फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.