बार्शिटाकळी तालुक्यात संचारबंदी कडक अंमलबजावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:29+5:302021-02-23T04:28:29+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री ८.०० वाजतापासून सोमवारी सकाळी ६.०० वाजतापर्यंत शहरात लागू करण्यात आलेल्या संपूर्ण ...
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री ८.०० वाजतापासून सोमवारी सकाळी ६.०० वाजतापर्यंत शहरात लागू करण्यात आलेल्या संपूर्ण संचारबंदीदरम्यान रविवारी सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील औषधी दुकाने, दवाखाने आणि डेअरी वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने बंद राहिली. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला व्यावसायिक वा नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बार्शिटाकळी शहरासह संपूर्ण तालुक्यात संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बार्शिटाकळी शहर, पिजंर, महान , राजंदा, कान्हेरी सरप, धाबा, जामवसू , लोहगड, राहीत, साहीत, खेर्डा भागाई, टिटवा, जमकेश्वर, आळदा,रूस्तमाबाद, सुकळी, हातोला, झोडगा, दोनद, दगड पारवा, तीवसा, पुनोती, काजळेश्वर, उजळेश्वर , अश्या सर्व ग्रामीण भागाची माहिती घेतली असता संचारबंदीचे पालन करण्यात आले. रविवारी गजबजणारे रस्ते ओस पडल्याचे दिसून आले. (फोटो)