पशुवैद्यकीय डॉक्टरांचा संप; पशुपालकांचे हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:20 AM2021-07-31T04:20:16+5:302021-07-31T04:20:16+5:30

तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी दि. १३ जुलैपासून संप सुरू केला आहे. शासकीय पशुवैद्यकीय सेवा अपुरी ...

Strike of veterinary doctors; The condition of pastoralists! | पशुवैद्यकीय डॉक्टरांचा संप; पशुपालकांचे हाल!

पशुवैद्यकीय डॉक्टरांचा संप; पशुपालकांचे हाल!

Next

तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी दि. १३ जुलैपासून संप सुरू केला आहे. शासकीय पशुवैद्यकीय सेवा अपुरी असल्याचे चित्र दिसत आहे. विविध मागण्यांसाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी संप पुकारल्याने पशुपालकांची धावपळ होत असून, अडचण वाढली आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी विदर्भ वेटरनरी ॲण्ड डेअरी डिप्लोमा होल्डर ऑर्गनायझेशनच्यावतीने अध्यक्ष डॉ. सुजित बन्नोरे, उपाध्यक्ष डॉ. अमोल नवले, सचिव डॉ. वैभव बनारसे, कोषाध्यक्ष डॉ. मुकेश भोयर, मुख्य सल्लागार डॉ. राजेश फुलझेले, संघटक सचिव डॉ. रितेश उंबरकर, डॉ. राजेश वानखेडे, डॉ. विनोद पुंडके, डॉ. एकनाथ निंघोट, डॉ. अनिल देशमुख, डॉ. विशाल येवोकार, डॉ. दिनेश मोगरे, डॉ. अमोल काकोडे, डॉ. सुधीर गुल्हाने, डॉ. राजेश खंडारे, डॉ. शुद्धोधन खांडेकर, डॉ. सिद्धार्थ डोंगरे, डॉ. आनंद भगत, डॉ. शुभम नवले, डॉ. अमोल जवंजाळ, डॉ. अतुल जामनिक, डॉ. पंकज बांबल, डॉ. मनोहर खांडेकर, डॉ. सचिन चक्रनारायण आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.

------------------------------------

मूर्तिजापूर तालुक्यात पशुविकास अधिकारी गटाच्या तीन जागा भरलेल्या आहेत. अ गटासोबतच क गटातील सात सहकारी तालुक्यात सेवा देत आहेत. खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना अ गटाचे मार्गदर्शन घेऊन काम करता येईल.

- डॉ. अनंत पाटील, पशुसंवर्धन अधिकारी, मूर्तिजापूर.

Web Title: Strike of veterinary doctors; The condition of pastoralists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.