एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता सहा महिन्यांची ‘फ्री’ पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:47 PM2018-12-15T14:47:09+5:302018-12-15T14:47:18+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांना आता दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास देण्याचा निर्णय राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे.

 ST's retired employees are now given six months 'free' pass | एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता सहा महिन्यांची ‘फ्री’ पास

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता सहा महिन्यांची ‘फ्री’ पास

Next

- संजय खांडेकर
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांना आता दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास देण्याचा निर्णय राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता झाल्याने कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे.
रा.प. महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या आणि वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या अधिकारी-कर्मचाºयांना सलग दोन महिने ‘फ्री’ पास दिली जात असे. दोन महिन्यांच्या कालावधीत प्रवास पूर्ण होत नसल्याने फ्री पासची मुदत सहा महिने करण्यात यावी, अशी मागणी एसटीतील विविध कर्मचारी संघटनांनी केली होती. संघटनेच्या मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री आणि रा. प. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे. १ जून २०१८ रोजी कामगारांना वेतनवाढ जाहीर करतानाच फ्री पासेसची मुदत वाढविली जाणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यासंदर्भात परिपत्रक निघाले नव्हते. दरम्यान, डिसेंबरपासून फ्री पासेसची अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना प्राप्त झाला आहे.

जुलै ते फे ब्रुवारी दरम्यानच अनुज्ञेय
सहा महिन्यांची ‘फ्री’ पास केवळ जुलै ते फेब्रुवारी या दरम्यानच वापरता येईल. साध्या गाड्यांसाठी फ्री पास राहील. निमआराम किंवा इतर गाड्यांतून प्रवास केल्यास भाड्याचा फरक भरून द्यावा लागेल. एका बसमध्ये केवळ दोन प्रवासधारक प्रवास करू शकतील. संगणकीकरण होईपर्यंत प्रचलित पद्धतीच्या पासेस वितरित होतील. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाºयांना नोकरीत असल्याचा दाखला सोबत ठेवणे आवश्यक आहे.

 

Web Title:  ST's retired employees are now given six months 'free' pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.