ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बंदच; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:55+5:302021-09-02T04:40:55+5:30
शहरी भागात जाणाऱ्या गाड्यांना प्रतिसाद ग्रामीण भागातील बस बंद असल्या तरी शहरी भागातील या बसला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत ...
शहरी भागात जाणाऱ्या गाड्यांना प्रतिसाद
ग्रामीण भागातील बस बंद असल्या तरी शहरी भागातील या बसला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
निर्बंधांच्या वेळेत सूट देण्यात आल्याने अमरावती, पुणे, औरंगाबाद, जळगाव फेऱ्या वाढल्या आहे.
वेळोवेळी पावसाचा व्यत्यय येत असल्याने आगार क्रमांक २ मध्ये प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना या बसेसचा आधार!
जिल्ह्यात अद्यापही ग्रामीण भागातील बस बंद आहेत; परंतु जिल्ह्याबाहेर तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बस मार्गात येणाऱ्या खेड्यापाड्यावर थांबतात. त्यामुळे या बसना नागरिकांना आधार मिळत आहे.
मुक्कामी जाणाऱ्या सहा गाड्यांचे काय?
अकोला आगार क्रमांक २ मधून पारस, पातूर नंदापूर, जऊळका, खेट्री, राहित, धामणा या सहा ठिकाणी मुक्कामी गाड्या सोडण्यात येत असतात; परंतु या गाड्या बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून पारसला येणारी मुक्कामी बस बंद आहे. त्यामुळे अकोला येथे ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. अनेकवेळा खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.
- श्रीकृष्ण इंगळे
बस बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन, चालक अवाच्या सव्वा दर आकारत आहेत. शहरात जाण्यासाठी दुसरी सुविधा नसल्याने नाईलाजास्तव जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
- भावेश जयस्वाल
शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा
ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शहरातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बस अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. या शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.