एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:37+5:302021-09-27T04:20:37+5:30

एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. या सवलत ...

ST's smart card scheme extended till December 31 | एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next

एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम उपक्रम राबविले जाऊ नये, असे निर्देश दिल्याने, तसेच अनेक ज्येष्ठ प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही अंतिम मुदतवाढ

प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. सध्या देण्यात आलेली मुदतवाढ ही अंतिम असल्याचे पत्र एसटी महामंडळाचे अकोला विभागातील सर्व आगारांना प्राप्त झाले आहे.

Web Title: ST's smart card scheme extended till December 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.