समिती गठित होईना नवीन वृद्ध कलावंतांची अडकली निवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:49+5:302021-08-20T04:23:49+5:30

संतोष येलकर अकोला : वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत गेल्या वर्षभरापासून जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती ...

Stuck selection of new and old artists without formation of committee! | समिती गठित होईना नवीन वृद्ध कलावंतांची अडकली निवड !

समिती गठित होईना नवीन वृद्ध कलावंतांची अडकली निवड !

Next

संतोष येलकर

अकोला : वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत गेल्या वर्षभरापासून जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे योजनेंतर्गत जिल्ह्यातील नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवड करण्याची प्रक्रिया अडकली असून, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे ६५० अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे निवड समिती केव्हा गठित होणार आणि नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवड होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दरमहा २ हजार २५० रुपये मानधन दिले जाते. मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. त्यासाठी योजनेंतर्गत जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समितीमार्फत वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्या वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दरमहा मानधनाचा लाभ देण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती गठित करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; मात्र गत वर्षभरापासून निवड समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे योजनेंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे ६५० वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी, निवड समिती गठित नसल्याने, प्राप्त झालेले प्रस्ताव प्रलंबित असून, नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवडप्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तराव निवड समिती गठित केव्हा होणार आणि जिल्ह्यातील नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची मानधनासाठी निवड केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

५९१ वृद्ध साहित्यिक, कलावंतांना

दरमहा दिले जाते मानधन !

वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५९१ वृद्ध साहित्यिक व कलावंतांना सद्य:स्थितीत दरमहा २ हजार २५० रुपये मानधन दिले जात आहे. मानधनाची रक्कम वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते, अशी माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या शिफारशीने

निवड समिती केव्हा होणार गठित?

वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील नवीन साहित्यिक व कलावंतांची निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीने वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती गठित होणे आवश्यक आहे. परंतु वर्षभरापासून अद्यापही निवड समिती गठित झाली नसल्याने, पालकमंत्र्यांच्या शिफारशीने जिल्हास्तरावर निवड समिती गठित होणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: Stuck selection of new and old artists without formation of committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.