कॉपी पकडल्याने विद्यार्थ्याची प्राध्यापकास मारहाण

By admin | Published: May 17, 2014 07:52 PM2014-05-17T19:52:01+5:302014-05-17T20:19:59+5:30

कॉपी पकडल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने प्राध्यापकास मारहाण केली; गुन्हा दाखल.

The student beat up the professor after copying | कॉपी पकडल्याने विद्यार्थ्याची प्राध्यापकास मारहाण

कॉपी पकडल्याने विद्यार्थ्याची प्राध्यापकास मारहाण

Next

अकोला : अभियांत्रिकी शाखेचे पेपर सुरू असताना, प्राध्यापकाने एका विद्यार्थ्याची कॉपी पकडल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने प्राध्यापकास मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी बाभूळगाव येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बाभूळगाव येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागामध्ये कार्यरत प्रा. हितेंद्र चंद्रकांत मुळे यांच्या तक्रारीनुसार, अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर सुरू असताना, वर्गामध्ये एक विद्यार्थी कॉपी करीत होता. त्याची कॉपी आपण पकडली आणि त्याला बाहेर काढले. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या दोन ते तीन मित्रांसह कॉपी का पकडली. या कारणावरून आपल्यासोबत वाद घातला आणि अश्लील शिवीगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांनी तक्रारीमध्ये निखिल श्रीनागर, पवन इंगळे या विद्यार्थ्यांसोबत आणखी दोन ते तीन विद्यार्थ्यांची नावे दिली आहेत. पोलिसांनी प्रा. हितेंद्र मुळे यांची तक्रार चौकशीत ठेवली आहे. 

Web Title: The student beat up the professor after copying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.