आदीवासी भागातील गौणखनिज वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:17 PM2018-10-15T12:17:00+5:302018-10-15T12:18:30+5:30

अकोट: गौणखनिज वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थीचे आरोग्य व शिक्षण धोक्यात आले आहे. पोषक आहारात धुळीचे कण मिसळत असल्याने कुषोपणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त  विद्यार्थीनी 15 ऑक्टोबर रोजी  रस्ता व  विस्फोटक गोडाऊन रद्द आदी मागण्याकरीता रास्ता रोका सुरू केला आहे.

Students' agitation to stop mining transport in tribal areas | आदीवासी भागातील गौणखनिज वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा ‘रास्ता रोको’

आदीवासी भागातील गौणखनिज वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा ‘रास्ता रोको’

googlenewsNext

- विजय शिंदे
अकोट: गौणखनिज वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थीचे आरोग्य व शिक्षण धोक्यात आले आहे. पोषक आहारात धुळीचे कण मिसळत असल्याने कुषोपणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त  विद्यार्थीनी 15 ऑक्टोबर रोजी  रस्ता व  विस्फोटक गोडाऊन रद्द आदी मागण्याकरीता रास्ता रोका सुरू केला आहे. गौणखनिजचे ट्रक अडकले असुन आदीवासी बांधवाचा संतप्त फुटण्याची शक्यता वाढली आहे.  वृत्तलिहीस्तोवर अद्याप  प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळावर पोहचला नव्हता
  अकोट पंचायत समिती अंतर्गत मौजे रुधाडी या आदीवासी भागातील मुलांकरीता जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा आहे. सदर गाव से पोपटखेड ग्रामपंचायत हद्दीत येते. या शाळेलगतचा रस्ता खुपच खराब झाला आहे. या रस्त्यावरून दररोज खौणखनिज वाहतुक करणारे ट्रक व टिप्परच्या शेकडो फेरा होत आहेत. त्यामुळे टिप्पर मधील गौणखनिज व भरघाव वेगाने शाळा व घराना हादरे बसत आहेत. विशेष म्हणजे दररोज शालेय मुलाकरीता खिचडी शिजवण्यात येते. पंरतु सर्वॅ धुळीचे कण खिचडीत जात आहेत.त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत असुन .धुळीचे कण मिश्रण होत असलेला खिचडी हा सकस आहाराने कुपोषण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या गंभीर घटनाकडे जबाबदारी असलेले प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे संतप्त झालेले आदीवासी बांधव व मुलांनी 15 आॅक्टोबर रोजी सकाळी रास्ता रोको सुरू केला. ट्रक टिप्परची वाहतुक बंद पाडली. चिमुकले हातात पुस्तका ऐवजी फलक घेऊन सहभागी झाली आहेत. आदिवासी लोंकाचा रस्त्या साठी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. रस्ता दुरूस्ती,आरोग्य,भरघाव वाहतुकीला आळा यासह या परिसरात होऊ घातलेला स्फोटक प्रदार्थाचा साठा  होणारा गोडाउन रद्द करण्यात यावी अशी मागणी होत असुन आदीवासी बांधवाच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Students' agitation to stop mining transport in tribal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.