जिजाऊ कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:30+5:302021-09-09T04:24:30+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा देशपांडे, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रमणी जोशी, तसेच विशेष उपस्थिती म्हणून ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा देशपांडे, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रमणी जोशी, तसेच विशेष उपस्थिती म्हणून शाळेच्या माजी शिक्षिका वसुधा जलताडे, माजी शिक्षक अघडते सर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षिका रसिका मोहरीर यांनी सुमधुर आवाजात सरस्वती स्तवन म्हटले. मुख्याध्यापिका मेधा देशपांडे यांनी शाळेच्या प्रगतीवर दृष्टिक्षेप टाकला. १ सप्टेंबर, १९९७ रोजी स्थापन झालेल्या शाळेचं राेपटं आज मोठ्या प्रमाणावर विस्तारले. कोरोना काळात शाळा बंद हाेत्या. बहुतांश विद्यार्थिनींजवळ मोबाइल नसतानाही त्यांनी चिकाटीच्या बळावर यश मिळविल्याने प्रमुख अतिथी रमणी जाेशी यांनी शिक्षकांच्या पाठीवर काैतुकाची थाप दिली. शाळेतून प्रथम आल्याबद्दल पल्लवी बौरासी, द्वितीय क्रमांक आल्याबद्दल स्निग्धा रामटेके, तसेच इतिहास/राज्यशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल नंदिनी बैस हिला रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. अश्विनी मराठे हिला शाळेची स्टुडंट ऑफ द ईअर हा खिताब देण्यात आला. सूत्रसंचालन मनिषा मॅडम यांनी केले.