वसतिगृहातील विद्यार्थ्यांंचा जीव धोक्यात
By admin | Published: October 9, 2015 01:42 AM2015-10-09T01:42:49+5:302015-10-09T01:42:49+5:30
असामाजिक तत्त्वांचा वाढला संचार; वसतिगृहाचे गृहपालाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.
अकोला: टिळक रोडस्थित त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा संचार वाढल्याने विद्यार्थ्यांंंच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संभावित धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन वसतिगृहाचे गृहपाल यांनी पोलीस निरीक्षकांना गुरुवारी दिले. त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या तिसर्या माळ्य़ावर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह असून, येथे जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांंंनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांंंना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे, या अनुषंगाने वसतिगृहात आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. परंतु, या सुविधांचा अधिकतर उपयोग काही गुंड प्रवृत्तीचे लोक करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. इमारतीच्या पायर्यांवर मद्यपान करून तेथेच अस्वच्छता पसरविण्यात येते. या सोबतच वसतिगृह परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे चालत आहेत. एवढेच नव्हे तर या मंडळींचा हस्तक्षेप वसतिगृहामध्ये वाढत आहे. विद्यार्थ्यांंंसाठी असलेल्या वसतिगृहातील स्वच्छतागृहाचा उपयोगदेखील ही मंडळी करत आहे. या बाबत त्यांना टोकल्यास विद्यार्थ्यांंंना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांंंना मानसिक त्रास व्हावा म्हणून दररोज वसतिगृहाच्या मोटार पंपाची विद्युत वाहिनी खंडित करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांंंना नेहमीच पाण्यापासून वंचित राहावे लागते. वसतिगृहात असामाजिक तत्त्वांच्या वाढत्या संचारामुळे येथे मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दररोज होणार्या वादामुळे विद्यार्थ्यांंंच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन वसतिगृहाच्या गृहपालांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुरुवारी दिले.